Visitor No.: Website counter

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळ, जत यांच्या वतीने अखिल भारतीय होलार समाजाचा मेळावा.... कार्यक्रम पत्रिका खालीलप्रमाणे.......होलारसमाजातील १० वी आणि १२ वी च्या सर्व विद्यार्थांनी याही वर्षी दैदिप्यमान यश मिळवले...आणि उज्ज्वल निकालाची आपली परंपरा कायम ठेवली सर्व विध्यार्थ्यांचे अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.....!!!!!....रविवार दि. १५/०६/२०१४ रोजी अखिल भारतीय होलार समाज संघटनेची राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीची तसेच जिल्हा अध्यक्ष ,तालुका अध्यक्ष यांची बैठक राष्ट्रीय नेते अॅड. एकनाथ जावीर राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानदेव जावीर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नंदकुमार केंगार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. सर्वांनी उपस्तिथ राहून भरभरून प्रतिसाद दिला याबद्दल संघटना सर्व होलार समाज बांधवांची अंत्यंत आभारी आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीबाबत धोरणात्मक निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आले...

Dipak Aiwale

94.4%,10th SSC board result 2014 maharashtra

आपले पुणे येथील रहिवासी समाज बांधव तसेच अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे पुणे प्रदेश महासचिव प्रल्हाद आयवळे यांचे चिरंजीव दिपक ऐवळे याने १० वी मध्ये ९४.४% गुण मिळवून घवघवीत असे यश संपादन केले आहे. अखिल भारतीय होलार समाज संघटनेतर्फे त्याचे हार्दिक अभिनंदन व त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

सर्व समाजबांधवांना सप्रेम नमस्कार , होलार समाजाची अधिकृत अशी एकमेव www.holarsamaj .com या संकेतस्थळाचे उद्घाटन दिनांक ७/१०/२०१२ रोजी पुणे येथे झालेले आहे . सदरील संकेतस्थळामुळे जगातील सर्व होलारबांधवांची सर्व होलारबांधवांना एका क्लिक्कवर माहिती मिळणार आहे .
आज होलार समाजामध्ये अनेक मुले,मुली इंजिनिअर्स ,डॉक्टर्स ,वकील ,व्यवसायिक ,असून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उच्च पदावर गेलेले आहेत परंतु याची कोणतीही माहिती आज आपल्याकडे संकलित केलेली नाही व तशी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही तसच समाजातील विवाहच्छुक मुलामुलींना त्यांचे शिक्षणाप्रमाणे ,.व्यवसायाप्रमाणे स्थळ जमविण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांना फार मोठी शोधाशोध करावी लागते व त्याकरीता वेळ ,पैसा खर्च करावा लागतो व तेवढे करूनही योग्य असे स्थळ मिळेलच याची शाश्वती नसते ,त्यामुळे नाईलाजाने मुलाच्या व मुलीच्या वयाचा विचार करीता सुस्वरूप ,योग्य अशा स्थळएवजी तडजोड करून विजोड असे स्थळ मान्य करावे लागते व आयुष्यभर तडजोड करावी लागते .
  आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटनेच्या माध्यमातून फिरत असताना मुलामुलीच्या विवाहाचा फार मोठा प्रश्न मुलामुलींच्या आईवडिलांसमोर ठाकलेला आहे व त्यावर सर्वांगीण विचार करून समाजातील प्रत्येक विवाहच्छुक मुलामुलींनी त्यांच्या पालकांनी सदरील www.holarsamaj.com या संकेतस्थळावरील विवाहविषयक अर्ज भरून नाव नोंदविल्यास व आपली माहिती सादर केल्यास प्रत्येक समाजबांधवाना मुलामुलींकरिता योग्य स्थळ शोधण्याकरिता वेळेचा व पैशाचा खर्च येणार नाही .प्रत्येकाला "मोफत" विवाहच्छुक मुलामुलींची ,त्यांचे आई-वडिल ,नातेवाइक यांची तसेच मुला-मुलींच्या शिक्षणाची ,व्यवसायाची संपूर्ण माहिती घरबसल्या एका क्लिक्कवर उपलब्ध होणार आहे .त्यामुळे सर्व समाजबांधवांना विनम्र अवाहन करतो की आपण आपला न्यूनगंड काढून आपल्या मुलामुलीची ,स्वतःचीही माहिती सदरील "www .holarsamaj.com " संकेतस्थळावर भरावी .सदरील website बाबत कोणतीही शंका ,अडचण असल्यास आपण खालील फोनवर संपर्क साधून आपल्या शंकेचे ,अडचणीचे निरसन करून घ्यावे.

कळावे ,
Adv. एकनाथ दत्तात्रय जावीरAdv. Eknath Javir : 9422001508 | 020-25511660 | 020-25511661

Sushant Gore : 8087611678 | 9975628763